प्रामाणिकपना हा गुण अंगी असणं खूप महत्वाचं असतं . हा गुण माणसाला आयुष्यात यश प्राप्ती साठी महत्व पूर्ण ठरतो . प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्न करत राहिले की यश हे निश्चित मिळतच . प्रयत्न एवढे करा की अपयश आपल्यासमोर टिकणार नाही . आणि प्रयत्नांच्या जोरावर मिळवले यश सुध्दा आपल्यासमोर झुकेल .
प्रयत्न करताना अनेकवेळा हार पत्करावी लागेल . अनेक संकटांचा सामना करावा लागेल . तो सामना करत असताना एखादं वेळेस तुम्हाला वाटू ही शकत , की द्यावं सगळं सोडून आणि बसावं गुपचूप जे आहे त्यात सुख मानून . पण असं कधीही करू नका . तुम्हाला जे हवं आहे , जे तुमचं ध्येय आहे . स्वप्न आहे , ते साकार होईपर्यंत प्रयत्न करत रहा .
खूप प्रयत्न करूनही तुम्हाला जे हवं आहे , ते मिळालं नाही तर हिरमुसून जाऊ नका . सातत्याने प्रयत्न करत रहा . यश मिळेल ह्या आशेवर नाही तर , मी काही शिकवतोय , कुठलातरी नवीन गुण धर्म माझ्यामध्ये स्प्रेड होत आहे . हे आधी लक्षात घ्या . आणि मग नंतर विचार करा . प्रयत्न करायचं सोडायचं . की कायमस्वरूपी आपले प्रयत्न करणं चालू ठेवायचं .
प्रयत्न केल्यानंतर यश मिळालं तरी ही लगेच हवेत गोळ्या सोडू नका . आपल्याला हरभराच्या झाडावर चढवणारे खूप असतात . लगेच त्या झाडावर जाऊन बसू नका . झाडावर बसवणऱ्यानां इग्नोर करत चला . जर तुम्ही झाडावर जाऊन बसला तर , समजा तुमची वाटचाल पुन्हा एकदा अपयशाकडे सुरू झाली . म्हणून म्हणते यश मिळालं तरी , हुरळून जाऊ नका .
आयुष्यात परफेक्ट व्हायचं असेल ना तर , प्रामाणिक राहून प्रयत्न करण आणि यश मिळाल्यानंतर ही स्टॉप न घेता . यशाची पुढची पायरी चढन्यासाठी पुन्हा प्रयत्न करा . सातत्याने प्रयत्न करत रहा . आयुष्यात पुढे जातं रहा .
अतिशय अर्थपूर्ण रचना..👌👌👍
ReplyDeleteअतिशय सकारात्मक, संदेश देणारे लिखाण केले आहे 👌👌👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteअगदीच सुंदर लिहिलंय तू.. सकारात्मक msg दिलाय या लेखातून..तू
ReplyDeleteनेहमी सुंदर च लिहिते.खूप खूप शुभेच्छा पुढील लिखाणासाठी..असच लिहीत रहा ..हीच अपेक्षा👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप सुंदर लिखाण....✍️👍😅🍫🍫🍫🍫🍫🌹
ReplyDeleteसुंदर लेखन
ReplyDeleteNo problem Nitya
ReplyDelete..!
मी इकडे comments केली आहे...!
हिरव्या पट्ट्यात click होतंय तिकडेच खाली comments box white दिसतोय..!
ओके
तरीही काही असेल तर सोडवून बघू..🍧
आबा 🌷
Khup chan lihilya apratim
ReplyDelete