नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 8, 2021

गरीबी

गरीबी गरिबी गरिबी ,
जगण्याची खरी कसोटी ,
गरीब माणसापेक्षा ही बरा तो भिकारी ,
होत तर , नाही तो हजार संकटाचा शिकारी ,

गरीबी माणसाला लाचार करते ,
मनमारून जगायला शिकवते ,
लाज लज्जा शरम विसरून ,
फाटके - तुटके वस्त्र परिधान करायला ,
मजबूर करते ,

गरिबीला ठाऊक  नसते महागड्या वस्तूंची किंमत ,
कारण वस्तू खरेदी करण्याचीच नसते हीमंत ,

गरिबीला उन्ह सावलीचा  खेळ आपलासा वाटतो ,
कारण जगन्याचा आधार  त्याचा  ऊन्ह सावलीचं  असते ,

गरिबांच्या लेकरांना माहीत नसते हौस - मौस ,
हट्ट करायचे नाही , परिस्थितीनेचं  दिलेली असते धौस ,

आभाळ कोरड झालं ,
शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आलं ,
गरीबाच घर उध्वस्त झालं ,
कारण हातात असलेलं काम त्याचं गुप्त झालं ,
गरिबाच्या वाट्याला पुन्हा पुन्हा मरण आलं ,
गरिबीला त्याच्या वळण नवं मिळालं ......


4 comments:

  1. अप्रतिम.... अप्रतिम
    गरिबीच अगदी भावस्पर्शी वर्णन केलयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. खुप सुंदर वास्तवदर्शी रचना, अप्रतीम

    ReplyDelete
  3. अतिशय भावस्पर्शी रचना 👌👌👌👌👌👌✍️✍️✍️

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...